Advertisement

Responsive Advertisement

Ind vs Pak: महामुकाबल्याआधी भारत-पाक संघातल्या खेळाडूंची भेट, पाहा व्हिडीओ | asia cup 2022 dubai nternaIonal stadem

Ind vs Pak: महामुकाबल्याआधी भारत-पाक संघातल्या खेळाडूंची भेट, पाहा व्हिडीओ | 

asia cup 2022 


Ind vs Pak: गेल्या वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. त्यासाठी दोन्ही संघांचा सध्या दुबईत कसून सराव सुरु आहे. याच सरावादरम्यान काही भारतीय खेळाडू- सपोर्ट स्टाफ आणि पाकिस्तान



दुबई, 26 ऑगस्टभारत आणि पाकिस्तान संघांमधल्या महामुकाबल्याला आता उरलेत अवघे काही तास. आशिया चषकात हे दोन्ही संघ 28 ऑगस्टच्या संध्याकाळी आमनेसामने येणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकानंतर पहिल्यांदाच उभय संघांमध्ये हा सामना होतो. त्यासाठी दोन्ही संघांचा सध्या दुबईत कसून सराव सुरु आहे. याच सरावादरम्यान काही भारतीय खेळाडू- सपोर्ट स्टाफ आणि पाकिस्तानी संघातल्या सदस्यांची भेट झाली. यावेळी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बाबर आझम यांचीही भेट झाली.

भारतीय खेळाडूंकडून आफ्रिदीची विचारपूस

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेला मुकावं लागणार आहे. पण आफ्रिदी सध्या पाकिस्तान संघासोबतच आहे. काल सरावावेळी भारतीय खेळाडू आणि शाहीन शाह आफ्रिदी यांची मैदानात भेट झाली. त्यावेळी विराट कोहलीसह युजवेंद्र चहल, रिषभ पंत यांनी त्याच्या दुखापतीसंदर्भात विचारपूस केली.

आशिया चषकातले स्टार आमनेसामने

दरम्यान यावेळी इतर संघातले खेळाडूही सरावानंतर मैदानाबाहेर चर्चा करताना दिसले. त्यात भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफसह पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या खेळाडूंचाही समावेश होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं खेळाडूंच्या भेटीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

रोहित-विराट सज्ज

दरम्यान कालच्या सराव सत्रात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं नेट्समध्ये कसून सराव केला. दोघांच्या फलंदाजीचा व्हिडीओ काल बीसीसीआयनं ट्विटरवर शेअर केला होता. त्यात विराट आणि रोहित दोघंही नेट्समध्ये फटके मारताना दिसत आहे.

dubai international stadium , asia cup time tebal , kuldeep sen ,

Post a Comment

0 Comments