200 रूपयांसाठी खेळणारा IPL मुळे झाला करोडपती, थोड्याच दिवसात गाजवणार जग
काळापेक्षा कोणीही बलवान नसतो, असे म्हणतात, पण अशाच एका खेळाडूचे नशीब बदलले आहे. हा घातक खेळाडू एकेकाळी 200 रुपयांत क्रिकेट (Cricket) खेळायचा, पण आता करोडो रुपये मिळवून तो आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये खळबळ उडवून देणार आहे.
नवी दिल्ली, 23 मार्च: काळापेक्षा कोणीही बलवान नसतो, असे म्हणतात, पण अशाच एका खेळाडूचे नशीब बदलले आहे. हा घातक खेळाडू एकेकाळी 200 रुपयांत क्रिकेट (Cricket) खेळायचा, पण आता करोडो रुपये मिळवून तो आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये खळबळ उडवून देणार आहे. आता हा खेळाडू करोडपती झाला आहे.
यावेळी राजस्थान रॉयल्सने वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला (navdeep saini) आयपीएल साठी 2.6 कोटी रुपयांना विकत घेतले. 29 वर्षीय नवदीप सैनीमध्ये 145-150 किमी प्रतितास वेगाने चेंडू सातत्याने फेकण्याची क्षमता आहे. तो टीम इंडियाकडून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो.
कधी काळी 200 रुपयेसाठी खेळत होता क्रिकेट
नवदीपची आतापर्यंतची वाटचाल संघर्षमय आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहलीसारखे खंबीर कर्णधारांचा पाठिंबा मिळाल्याने नवदीपने भारतासाठी खेळण्याचं स्वप्न साकारलं आहे.
स्थानिक क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या नरवाल यांनी करनाल प्रीमिअर स्पर्धेदरम्यान नवदीपला पहिल्यांदा पाहिलं. हा कार्यकर्ता कामाचा आहे हे त्यांनी हेरलं. त्यांनीच नवदीपला दिल्ली संघाच्या सरावावेळी रोशनहारा क्लब इथं यायला सांगितलं.
0 Comments